सहकारी बँकेतील १० वर्ष जुन्या संचालकांना राज्य सरकारकडून तूर्त दिलासा – सत्येन मुंदडा
कोपरगाव मनिष जाधव – बँकिंग रेग्युलेशन कायदा नुसार १० वर्ष जुन्या सहकारी बँकेतील संचालकांना पुन्हा संचालक होण्यास प्रतिबंध लावला होता. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती. या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध झाला होता.

सहकारी बँकेचे भवितव्य धोक्यात आले होते. या कायद्याविरोधात फेडरेशन कोर्टात गेले होते. संचालकांच्या मुदती संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्य सहकारी विभागाला आहे केंद्र सरकारला नाही. हा निर्णय लोकशाही व घटनाविरोधी आहे असे मत संचालकांच्या वतीने मांडण्यात आले होते.
बऱ्याच ठिकाणी १० वर्षावरील संचालकांना अपात्र घोषित करण्यात आले होते. व पुन्हा निवडणुकीस उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती.
परंतु राज्य सरकारने नुकताच ठराव करून राज्य निवडणूक प्राधिकरण व सहकार खात्यास १० वर्ष जुन्या संचालकास अपात्र ठरवू नये असे निर्देश दिले आहे. त्यामुळे तूर्तास जुन्या संचालकांना निवडणूक लढविण्यास मुभा मिळाली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे संचालकामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाचे सहकारी बँकिंग क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. असे मत अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशन चे चेअरमन श्री सत्येन मुंदडा यांनी व्यक्त केले.














