११ वर्ष सेवा, ९ वर्ष मेडिकल उपक्रम
प्रभाग ६ मध्ये ‘मुकुंद भुतडा’ नावावर वाढता विश्वास
कोपरगाव (मनिष जाधव) –
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे मुकुंद भुतडा हे नाव. उच्चशिक्षित, संयमी स्वभावाचा आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेला हा लोकाभिमुख तरुण मतदारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

धार्मिक व सेवाभावी कार्याची कुटुंबपरंपरा लाभलेल्या मुकुंद भुतडा यांनी सामाजिक वाटचाल लहानपणापासूनच सुरू केली. विशेष म्हणजे श्री साई बालाजी पालखी सोहळ्यात त्यांनी अविरत ११ वर्षे सेवा बजावली आहे, तर सलग ९ वर्षांपासून पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी मेडिकल सेवेचे आयोजन करून हजारो वारकऱ्यांना वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. वारकऱ्यांच्या पावलांशी पाऊल जुळवत, विनामोबदला वैद्यकीय आणि मानवसेवा देणारी त्यांची ही परंपरा त्यांना खऱ्या अर्थाने समाजहितैषी नेता म्हणून ओळख मिळवून देते.
याशिवाय आदर्श युथ क्लबचे संस्थापक म्हणून युवकांना संघटित करणे, साईंगाव पालखी सोहळ्यातील निस्वार्थ सेवा, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट – साई तपोभूमीचे उपाध्यक्ष म्हणून राबवलेले उपक्रम, प्रेरणा क्लब, माहेश्वरी समाज आणि इतर संस्थांतून केलेली सातत्यपूर्ण धडपड—या सर्वामुळे त्यांचे कार्य प्रभागाच्या पलीकडे दणदणीतपणे जाणवते.
धार्मिक कार्यक्रम असो की सामाजिक उपक्रम—मुकुंद भुतडा यांची उपस्थिती कार्याला नवी ऊर्जा देते. शहरावर आलेल्या पूर, आग किंवा इतर संकटांमध्ये मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. कोणाचेही दुःख पाहून स्वतःहून पुढे येऊन मदत करणारा, लोकांशी आपुलकीने जोडणारा असा त्यांचा स्वभाव नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करतो.
प्रभागातील नागरिकही स्पष्ट म्हणतात, “समस्या सांगितल्या की त्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम धावणारा आणि प्रत्येकाशी आपलं माणूसपणाने असणारा असा मुलगा या प्रभागाला हवाच होता.”














