आपला जिल्हा

विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मनिष जाधव 9823752964

विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

कोपरगाव मनिष जाधव – दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना निवेदन दिले.

ग

महाराष्ट्रात व देशांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने अतिशय मोठ्या प्रमाणात घोळ होत आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत.
विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन निदर्शने करून केंद्र सरकारकडे न्याय मागत असताना सरकार मात्र कुठली दाद देत नाही.उलट लहान विद्यार्थी व मुलींना देखील दिल्लीत पोलीसांनी अमानुष व आक्षेपार्य मारहाण केली आहे.

ओ
या देशाची वाटचाल हुकूमशाही कडे होऊ नये व विद्यार्थ्यांना आपलं भविष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊ नये यासाठी आज विविध मागण्या घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप वर्पे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले, तालुकाध्यक्ष, बापू रांधवणे, शहराध्यक्ष स्वप्नील पवार, तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे,तालुका युवक अध्यक्ष निखिल थोरात, शहर कार्याध्यक्ष रिंकू मगर, सोशल मीडिया अध्यक्ष ऋतुराज काळे, तालुका उपाध्यक्ष शशिकांत सदाफळ, युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन पाचोरे,युवक तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश गवळी,प्रशांत मेहेरखांब, सुरज औताडे,किरण भालेराव,किशोर जाधव सोमनाथ घारे,नंदकिशोर जाधव,ओंकार वढणे, माजिद पठाण,ज्ञानदेव जाधव,तेजस दिघे, ओम सरवार,सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!