Uncategorized

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवनी सदैव कटिबद्ध– प्राचार्य मोहसीन शेख

सपादक मनिष जाधव 9823752964

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवनी सदैव कटिबद्ध– प्राचार्य मोहसीन शेख

फुलांचा वर्षाव, फुग्यांची आकर्षक सजावट अन् आनंदाचा जल्लोष

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

कोपरगाव मनिष जाधव – शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता, नवीन मित्रांची ओढ आणि ज्ञानमंदिरात पुन्हा एकदा उमटलेले चिमुकल्यांचे हसरे चेहरे… अशा आनंददायी वातावरणात कोपरगाव तालुक्यातील संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.

अ

अ

ए

शाळेच्या परिसरात आकर्षक फुग्यांची सजावट, रंगीबेरंगी क्लासरूम, प्रवेशद्वारावर फुलांचा वर्षाव आणि आनंदी वातावरणामुळे विद्यार्थी व पालक भारावून गेले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान पाहण्यासारखे होते.

ओञ

विद्यार्थ्यांच्या स्वागताचे हे विशेष नियोजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे, आमदार विवेक भैय्या कोल्हे आणि विश्वस्त रेणुकाताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची गोड ओळख व्हावी आणि शिक्षणाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही विशेष परिश्रम घेतले.

उ

छ
Oplus_131072

यावेळी शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत करताना मनोगत व्यक्त कयताना म्हणाले की, आज शाळेच्या प्रांगणात उमटलेले चिमुकल्यांचे हास्य आणि त्यांच्या उत्साहाने भरलेले पाऊल हेच आमच्यासाठी सर्वात मोठे यश आहे. प्रत्येक विद्यार्थी हा एक उमलणारे फूल आहे. योग्य शिक्षण, संस्कार आणि प्रेमळ वातावरण मिळाले तर तो आपल्या आयुष्यात नक्कीच सुगंध पसरवतो. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आम्ही मुलांना केवळ परीक्षेसाठी नाही, तर जीवनासाठी तयार करण्याचा संकल्प केला आहे. ज्ञानासोबत आत्मविश्वास, शिस्त, संवेदनशीलता आणि मानवतेचे मूल्य रुजविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चला, नवीन आशा, नवी स्वप्ने आणि नव्या उमेदीने या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करावी असे शेवटी प्राचार्य मोहसीन शेख म्हणाले. या स्वागत सोहळ्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला असून, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने झाली.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!