Uncategorized

विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे खरे समाधान – सौ. रेणुका कोल्हे

मनिष जाधव 9823752964

विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे खरे समाधान – सौ. रेणुका कोल्हे

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली. या प्रसंगी स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा गौरव वाढला असून पालकांनीही आनंद व्यक्त केला.

1

I

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य मोहसीन शेख यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचा विशेष उल्लेख केला. आपल्या मनोगतात ते म्हणाले, “यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यामागे सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जोड असते. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे तर चांगला माणूस बनण्यासाठी शिक्षण घ्यावे. आज आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे संजीवनी परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत अशी अपेक्षा प्राचार्य मोहसीन शेख यानी व्यक्त केले.

4

4

यावेळी बोलताना सौ. रेणुका कोल्हे म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या विश्वासाचे फळ आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रचंड क्षमता असते. योग्य दिशा, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थी कोणतेही यश प्राप्त करू शकतात. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून शिक्षणासोबत संस्कार आणि गुणवत्ता यांनाही प्राधान्य दिले जाते. भविष्यातही आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून संस्थेचे नाव उज्ज्वल करतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे शेवटी सौ. कोल्हे म्हणाले. कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!