आपला जिल्हा

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, अंदरसुलचा अनोखा उपक्रम

मनिष जाधव 9823752964

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, अंदरसुलचा अनोखा उपक्रम

विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारला दीप; ‘पाणी म्हणजे जीवन’चा संदेश

दीपावलीच्या प्रकाशोत्सवाला दुष्काळ आणि जलसंवर्धनाची जोड; ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा प्रभावी संदेश

अंदरसुल सचिन सोनवणे : दीपावली म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण. मात्र, या प्रकाशोत्सवाबरोबरच पाण्याचे महत्त्व आणि दुष्काळाची जाणीव समाजाला करून देण्यासाठी मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, अंदरसुल येथील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम साकारला.

विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून मैदानावर आकर्षक दीपाची प्रतिकृती साकारली. दीपाच्या मध्यभागी ‘पाणी म्हणजे जीवन’ असा संदेश देत जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

ज

दीपावलीच्या काळात प्रत्येक घरात प्रकाशाचे दिवे लावले जातात; परंतु दुसरीकडे अनेक भागांत दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे. या विरोधाभासाची जाणीव करून देत विद्यार्थ्यांनी ‘दिव्याचा प्रकाश तेवत ठेवायचा असेल, तर जीवनाचा आधार असलेले पाणीही जपले पाहिजे’ हा संवेदनशील संदेश दिला.

‘पाणी आहे तर जीवन आहे’, ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ आणि ‘दुष्काळ टाळण्यासाठी आजच पाणी जपा’ अशा संदेशातून विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. दीपावलीच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
सदर उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, कला शिक्षिका प्रतिक्षा साताळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, सुदाम सोनवणे उपाध्यक्ष, अमोल सोनवणे सरचिटणीस, मकरंद सोनवणे खजिनदार, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा संचालक आर बी गायकवाड तसेच सर्व संचालक यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

सदर प्रसंगी सीनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुवर्णा म्हस्के, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे,माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, तसेच शिक्षक संतोष जाधव,महेश मेहेत्रे,सुषमा सोनवणे,दिपाली सोनवणे,सुजाता भागवत प्रतीक्षा,साताळकर कोमल जमधडे,स्नेहल थोरात,सोनाली पाटोळे,अश्विनी मेहेत्रे,माधुरी निकम,निर्मला शिकारे,वैशाली शिंदे आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!