कष्टातून घडलेलं नेतृत्व; सनी काळे प्रभाग ८ मधील आशावादी चेहरा” – अॅड. पोळ
कोपरगाव मनिष जाधव – प्रभाग क्रमांक ८ हा राजकीय दृष्टीने फार महत्वाचा समजला जातो याच प्रभागातून शिंदे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार सनी काळे यांच्या कार्यशैलीबाबत सामाजिक कार्यकर्ते अॅड. नितीन पोळ यांनी विशेष मत व्यक्त करत त्यांच्या प्रामाणिक, कष्टाळू आणि लोकाभिमुख स्वभावाचे कौतुक केले आहे. लोकांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्या सोडवण्यासाठी तत्परतेने धाव घेण्याची वृत्ती सनी काळे यांच्या व्यक्तिमत्त्वात ठळकपणे दिसत असल्याचे अॅड. नितीन पोळ यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

अॅड. नितीन पोळ म्हणाले की, कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थितीतही सनी काळे यांनी परिस्थितीशी लढत चहाचा व्यवसाय सुरू केला. घरातील जबाबदाऱ्या पार पाडत, एका फोनवर काही मिनिटांत चहा पोहोचवून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा हा तरुण आजही त्याच प्रामाणिकपणाने लोकांचे काम करतो व विशेष म्हणजे “सनीमध्ये गर्व नाही, अहंकार नाही. साधा स्वभाव, मनमोकळं हसू आणि समोरच्याचा आदर करण्याची वृत्ती—ही त्याची खरी ताकद. तो लोकांमध्ये मिसळतो, त्यांच्या समस्या समजून घेतो आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. वॉर्ड ८ मधील प्रत्येक घटकांशी त्याचा दांडगा जनसंपर्क निर्माण झालेला असुन सनी काळे हे समाजातील समतोल, बंधुभाव आणि न्याय हे त्यांचे कार्यधोरण आहे.
पालिका ही लोकांची समस्या सोडवण्याची पहिली जागा आहे. सनी काळे सारखे युवक पालिकेत सदस्य म्हणून गेले तर साध्या माणसाला न्याय मिळण्यासाठी आवाज बुलंदपणे उठेल. त्याच्या काम करण्याच्या इच्छाशक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे सनी काळे यांच्या उमेदवारीला सामाजिक स्तरावर महत्त्वपूर्ण बळ देणारे ठरणार असल्याचे अॅड. नितीन पोळ यांनी मत व्यक्त केले आहे.














