आपला जिल्हा

अकरावीच्या नवोदित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत !!

मनिष जाधव 9823752964

अकरावीच्या नवोदित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत !!

येवला सचिन सोनवणे – मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या नवीन विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कॉलेज विश्व विषयी प्रचंड उत्सुकता आणि आनंद पहायला मिळाला.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आर. बी गायकवाड, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुवर्णा म्हस्के, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, इंग्लिश मीडियमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान उपस्थित होते.

अ
Oplus_131072

प्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राची संस्कृती जपत औक्षण करून व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.तसेच शाळेचे शिस्तबद्ध वातावरण सोडून कॉलेजच्या खुल्या विश्वात पाऊल ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसमध्ये Welcome to MSGS jr college सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते .

ऊ
प्राचार्यांनी आपल्या मार्गदर्शनात महाविद्यालयाची यशस्वी परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा विभाग, शिस्त आणि अभ्यासक्रमात होणारे बदल याबद्दल सविस्तर माहिती दिली.उपस्थित प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांना नियमित उपस्थित राहण्याचे आवाहन करत उज्वल भविष्य साठी शुभेच्छा दिल्या. नव्या स्वप्नांसह नव्या उत्साहात आणि नव्या मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने महाविद्यालयाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!