येवला शहरात चिमुकल्यांनी केली स्वच्छता व माझी वसुंधरा बाबत जनजागृती
येवला प्रतिनिधी – स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत येवला नगरपरिषद व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंतर्गत अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम ukg lkg या विद्यार्थ्यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माजी वसुंधरा 3.0 येवला शहरात पारेगाव रोड ते बाजीराव नगर पर्यंत रॅली काढत स्वच्छतेचा संदेश दिला व त्यानंतर बाजीराव नगर येथील गार्डनला भेट देत खेळण्याचा आनंद लुटला व परिसरात माझी वसुंधरा अंतर्गत 3.0 हरित शपथ घेतली व परिसरात 50 वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे यांनी प्रिन्सिपल अल्ताफ खान यांना वृक्ष देऊन सन्मानित केले व त्यांच्या हस्ते परिसरात 50 वृक्षांची लागवड करण्यात आली व तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अंतर्गत ओला कचरा विलगीकरण सुका कचरा विलगीकरण इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर सौर ऊर्जा रेन वॉटर हार्वेस्टिंग याबाबत प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
पर्यावरण समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त झाडे लावून झाडांचा संगोपन करावे तसेच प्लास्टिकचा वापर करू नये पाण्याचा योग्य विनियोग करावा झाडांची देखभाल करावी व नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य मिळाले पाहिजे असे सूचना यावेळी मुख्यधिकारी यांनी दिल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित स्वच्छता निरीक्षक सागर झावरे गोविंद गवंडे तुषार लोणारी संदीप बोढरे शुभम जाधव अल्ताफ खान अजहर खतीब प्रशांत बिवाल दीपक खैरनार माधुरी माळी दारुंटे प्रीती भालेराव आदी उपस्थित होते.