घरात घुसून मागासवर्गीय महिलेचा विनयभंग, विनयभंगासह अट्रासिटी चा गुन्हा दाखल
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे – श्रीगोंदा तालुक्याच्या राजधानीत पहाटेच्या सुमारास घरात घुसून मागासवर्गीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगासह अट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या गावात दि ९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या ४ चे सुमारास मागासवर्गीय पीडित महिलेच्या राहते घरात झोपली असता आरोपी जयदिप उर्फ वनराज भाऊसाहेब कोकाटे या इसमाने फिर्यादीच्या घराची कडी अनावधानाने उघडून घरात प्रवेश करून फिर्यादी झोपली असताना त्याच्या अंगावरील मुलायम चादर बाजूला करून तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला तेवढ्यात पीडित महिलेच्या हि बाब लक्षात आल्यानंतर ती झोपेतून अचानक उठली व तिच्या लक्षात आले कि आपल्या पाठीवर कोणी हात फिरवत आहे तिने पाहिले असता तिला वनराज भाऊसाहेब कोकाटे हा इसम दिसला पाठीवर हात फिरवून त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने पीडीतेचा विनयभंग झाला आहे याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करत आहेत मात्र या प्रकरणी अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसून आरोपी मोकाटच फिरत असल्याने पोलिसांबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
घरात घुसून विनयभंग मंग पोलिसांनी आयपीसी 448 का लावला नाही ?
मागासवर्गीय महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी ॲट्रॉसिटी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपीने घरात घुसून विनयभंग केला आहेत मग पोलिसांनी आयपीसी 448 का लावले नाही याचा खुलासा करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.