एस टी साठी नागरिकांचा रास्ता रोको,वाहतूक निरीक्षकाची नागरिकांवर दादागिरी
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे- श्रीगोंदा तालुक्यातील भावडी या ठिकाणी शालेय मुलांना येण्याजाण्या साठी बस मिळावी या मागणीसाठी भावडी येथील नागरिकांनी श्रीगोंदा जामखेड रोडवर रस्ता रोको केला होता त्यावेळी श्रीगोंदा बस आगाराकडून प्रतिनिधी म्हणून आलेल्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांनी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दादागिरी करताना दिसून आले मात्र नागरिकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता.

श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथून शिक्षण घेण्यासाठी आढळगाव श्रीगोंदा या ठिकाणी अनेक मुले येत असतात कर्जत वरून येणाऱ्या सर्व बस भावडीत थांबत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे भावडी गावासाठी स्वतंत्र बस सुरु करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी श्रीगोंदा जामखेड रोडवर रस्ता रोको केला होता त्यावेळी श्रीगोंदा आगराकडून प्रतिनिधी म्हणून तीन कर्मचारी स्वतंत्र बस घेवून त्या ठिकाणी आले होते त्यात सहाय्यक वाहतूक निरीक्षक स्वप्नील आहेर हेपण होते आल्यानंतर त्यांनी सुरवातीला नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अरेरावी करत नागरिकांना सांगत होते कि बस शिल्लक नाही त्यामुळे लगेच बस मिळणार नाही आपला प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे असे सांगत होते.

त्यावेळी एका नागरिकाने सांगितले कि बस शिल्लक नाही मग तिघांना इकडे यायला बस कशी मिळाली तसेच तुम्ही लोकसेवक आहेत तुम्ही नागरीक यांच्यावर दादागिरी करू शकत नाही अश्या अनेक गोंडस शब्दात नागरिकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला हा एकच चर्चेचा विषय बनला होता मात्र त्यानंतर सहाय्यक वाहतूक निरीक्षक स्वप्नील आहेर यांची हाताची घडी तोंडावर बोट अशीच भूमिका घेतली त्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या सहकार्याने सकाळी ९ वाजता रोज बस पाठविण्याचे कबूल करून लेखी पत्र दिले व कर्जत, जामखेड,बीड आस्ठीया सर्व आगारातून येणाऱ्या सर्व गाड्या भावडी या ठिकाणी थांबतील अश्या सूचना देण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले त्यानंतर भावडी ग्रामस्थांनी आपला रस्ता रोको स्थगित केला यावेळी गावातील नागरिकासह नायब तहसीलदार निलेश वाघमारे,सहय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.