भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय शालेय फ्लोअर बॉल स्पर्धा संपन्न
संगमनेर प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर ,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय संगमनेर भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर आयोजित
जिल्हास्तरीय शालेय फ्लोअर बॉल स्पर्धा 2024 भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या 17 वर्ष वयोगट मुले व मुली संघात द्वितीय क्रमांक ,19 वर्ष वयोगट मुले संघास द्वितीय क्रमांक व 19 वर्ष वयोगट मुलींच्या संघास प्रथम क्रमांक मिळून पुणे विभागीय शालेय 19 वर्षे वयोगट मुलींच्या संघाची फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी निवड झाली तसेच 17 वर्ष मुले व मुली 19 वर्ष मुले या तीनही संघातील 9 खेळाडूंची पुणे विभागीय शालेय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य,उपप्राचार्य,क्रीडा शिक्षक ,शिक्षक शिक्षकेतर सेवक वृंद सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुणे विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा…