
विविध सामाजिक उपक्रमांनी सामाजिक कार्यकर्ते कैलास सोमासे यांचा अनोखा वाढदिवस साजरा
शैक्षणिक साहित्य वाटप ; शुभेच्छांचा वर्षाव
कोपरगाव मनिष जाधव – सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन काम करणारे तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे यांचे विश्वासू समर्थक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे कैलास सोमासे यांचा वाढदिवस तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा होताच तालुक्यात चर्चेचा विषय बनला असून सर्वच स्तरातून कैलास सोमासे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच आयोजित केलेल्या उपक्रमांचा तालुक्यातुन कौतुक होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते कैलास सोमासे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार च्या वतीने कोपरगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 9 खडकी येथे शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक संपूर्ण शैक्षणिक साहित्य चे वाटप करून मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केला. आयोजित केलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत असुन याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन केल्यास निश्चितच विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होईल.
खडकी परिसरातील शाळेमध्ये कष्टकरी मोलमजुरी करणारे पालक यांचे मुलं शिक्षण घेत आहे परंतु शाळेच्या परिसर मोठ्या प्रमाणात चिखलमय झाल्याने अनेक अडचणी येत आहेत शिक्षकांसह , विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तारेवरची कसरत करावी लागत आहे हे शाळेतील शिक्षकांनी कैलास सोमासे यांच्या निदर्शनास आणून देताच सर्व परिस्थिती लक्षात घेऊन कोणताही विचार न करता स्वखर्चाने मुरूम टाकून देण्याचे जाहीर केले तसेच शाळेतील विविध सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कैलास सोमासे यांनी सांगितले.

सदर प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका गाडेकर मॅडम, माणिक कदम सर, वारुळे मॅडम, मुजमुले मॅडम शाळेच्या मदतनीस साळवे ताई त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख, राहुल खरात, रहीम शेख, योगेश गवारे, सुनील मोकळ व श्याम शेवते इत्यादी हजर होते मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाल्या मुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विद्यार्थ्यांनी सामूहिक वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या विद्यार्थी व शिक्षक वर्ग या सर्वांचे आभार कैलास सोमासे यांनी मनःपूर्वक मानले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगर सेवक दीपक जपे, अमजत शेख, राहुल खरंत, गणेश गवावरे, शाम शेवते, सार्थक चवनके, मुनीर शेख, सुनील मोकळ, नीलेश डोखे, राजू भाई शेख, सचिन पवार, यांच्यासह सर्व मित्र परिवाराने विशेष सहकार्य केले.