आपला जिल्हा

शिवरस्त्याने घेतला मोकळा श्वास

संपादक मनिष जाधव 9823752964

शिवरस्त्याने घेतला मोकळा श्वास

अंदरसुल सचिन सोनवणे – बऱ्याच वर्षांपासून बंद असलेला पिंपळगाव लेप ते दहेगाव पाटोदा शिवरस्ता महसूल विभागाच्या पुढाकारातुन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सामंजस्याने आज खुला करण्यात आला.

dainik jansanjivani logo

शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या भरभराटीसाठी ग्रामीण भागात शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे असणे आवश्यक असते. पण अनेकदा हे रस्ते वेगवेगळ्या कारणाने अतिक्रमण करून नाहीसे केले जातात. असाच प्रकार पिंपळगाव लेप येथील गट नंबर 307/1 व 307/2 व दहेगाव पाटोदा येथील गट नंबर 49 यांच्यामधील शिवरस्त्याबाबत झाला होता. सदर शिवरस्त्यावर दोन्ही बाजूने शेततळे बांधल्याने शिवरस्ता गायब झाला होता. पिंपळगाव लेप ते दहेगाव पाटोदा हा शिवरस्ता अडवला गेल्याची तक्रार तहसीलदार प्रमोद हिले यांच्याकडे जून 2022 मध्ये दाखल झाली होती.प्रत्यक्ष 3 वेळा स्थळनिरीक्षण करण्यात आले. अनेकदा बैठका झाल्या, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न केले गेले पण वाद मिटत नव्हता. वादग्रस्त गटांची मोजणी करून त्यानुसार अतिक्रमण ठरवून शिवरस्त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.


माहे डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 मध्ये दोन्ही गटांची मोजणी करण्यात आली. मोजणी नंतर गटांच्या हद्दी निश्चित झाल्याने शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाला.
प्रांताधिकारी श्रीमती ज्योती कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रमोद हिले , मंडळ अधिकारी चेतन चंदावार, प्रदीप मोटे, तलाठी पूजा दिंडोरकर, पांडुरंग बोडखे, कोतवाल भाऊराव आहेर, अर्चना दौंडे यांनी दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शिवरस्ता मोकळा केला.
सदर शिव रस्ता मोकळा करण्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे सदर रस्त्यात येणारे शेततळे. परंतु सदर शेततळे न तोडता फक्त एक भिंतीचा काही भाग काढून व द्राक्ष बागेतील जागा वापरून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सदर रस्ता खुला करण्यात आला. याकामी अंबादास नामदेव काळे यांनी जेसीबी उपलब्ध करून दिले. त्याद्वारे अंदाजे 200 ते 250 मिटर अंतरावरील अतिक्रमण काढण्यात आले व 15 फुटांचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला.हा शिवरस्ता म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे.
या कामात तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, मोजणी विभागाचे सोमनाथ सानप,शशिकांत शिंदे, शशिकांत केंद्रे, शिरसगाव लौकी चे सरपंच विजय इंगळे यांचेसह दोन्ही बाजूचे शेतकरी बाबुराव नामदेव काळे, एकनाथ नामदेव काळे, अंबादास नामदेव काळे, नानाभाऊ नामदेव काळे, पुष्पा मोठभाऊ व्हालगडे, सुनील माणिक जाधव, गोकुळ बबन जाधव, मंदाबाई बबन जाधव,गायत्री जाधव, अशोक बंडू बुल्हे, यमुनाबाई बाजीराव वाघ यांनी सहकार्य केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!