आपला जिल्हानिवडणुकमहाराष्ट्र

राज्य सरकारकडून सरकारी खर्चाने राजकीय प्रचार – आमदार थोरात

संपादक मनिष जाधव 9823752964

राज्य सरकारकडून सरकारी खर्चाने राजकीय प्रचार – आमदार थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी ) रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये आनंदाने साजरा होत आहे. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत आहे. मात्र सध्या या नात्याचे होत असलेले राजकारण आणि सरकारी खर्चाने होत असलेला राजकीय प्रचार हा अत्यंत दुर्दैवी असल्याची टीकाही राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य  तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.रक्षाबंधनानिमित्त नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी आमदार बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन केले.यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते.
झ
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे राजकारण होणे दुर्दैवी आहे.हा निस्वार्थी प्रेमाचा संदेश देणारा जगाला आदर्शवत असा सण आहे. सध्या राज्य सरकारकडून शासकीय खर्चामध्ये राजकीय प्रचार केला जात आहे. विविध कार्यक्रमांना शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती केली जात आहे. यातून महिलांचे व स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात झालेले राजकारण हे कसे नसावे याचे उदाहरण आहे. पातळी सोडून राजकारण होत आहे. विरोध विचारांचा असावा पण व्यक्तिगत नसावा. जिव्हाळ्याची माणसे विरोध करत आहेत. हे दुर्दैवी आहे असे घडू नये.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने राजकारणासाठी पुढे लांबविल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका ही पुढे ढकललेल्या आहेत. खरे तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मात्र सध्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने होत असलेले निर्णय हे देशाच्या आणि लोकशाहीच्या हिताचे नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

काही लोक काँग्रेस पक्ष सोडून गेले म्हणून पक्ष संपत नाही. पक्ष वाढतो आहे. नव्यांना संधी मिळत आहे. नांदेड मध्ये मोठमोठे नेते सोडून गेले. मात्र जनता काँग्रेस बरोबर आहे याचे उत्तम उदाहरण आहे. काँग्रेस हा देश हिताचा विचार व देश हिताचे तत्त्वज्ञान असल्याने जनतेचा कायम मोठा पाठिंबा असून सध्या राज्य सरकारकडून सरकारी खर्चाने होत असलेले प्रचार हा महाराष्ट्रातील जनतेला कधीही आवडणार नाही असे विधिमंडळातील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!