येवला नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा यात्रा व बाईक रॅलीचे आयोजन
येवला प्रतिनिधी – राज्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान मोहीम सुरू असून दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी येवला नगर परिषदेच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी श्रीकांत फांगणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात हर घर तिरंगा यात्रा व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या सुरुवात गंगा दरवाज्यापासून ते काळा मारुती रोड शिंपी गल्ली ते पाटील वाडा कुकर गल्ली ते गांधी मैदान तर बाईक रॅली ची सुरुवात फत्तेबुरुज नाका ते येवला नगरपरिषद कार्यालय अशा स्वरूपात होती.
यावेळी कर्मचाऱ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा जयघोषाने परिसर दणाणून सोडला यावेळी काळा मारुती रोड येथे विटी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने स्वच्छ भारत अभियान वर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद येवला येथे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला एन्जो केम हायस्कूल येवला मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे जुनिअर कॉलेज अंदरसुल आदी विद्यालयाने सहभाग घेतला या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी श्रीकांत फांगणे कर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.
या कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यधिकारी रोहित पगार पाणीपुरवठा अभियंता श्रीमती रूपाली भालेराव स्वच्छता निरीक्षक सागर झावरे प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे करवनिरीक्षक आदित्य मुरकुटे राहुल पाटील शिवशंकर सदावर्ते लेखधिकारी विष्णू हाडके किरण अहिरे राजू लोंढे संजय लोणारी संजय। गोसावी राधेश्याम निकम शशिकांत मोरे नंदू शिंदे प्रवीण निकम विजय शिंदे सुषमा विखे आशा मोंढे संध्या गवळी उज्वला अहिरे सरस्वती तुंबारे राजेश निकम गौरव चुंबळे शितल शेळके प्रभाकर वाघ राजेंद्र जांभुळकर नितीन हाडके नितीन आहेर सुमित उपासने संदीप बोढरे स्वच्छता ब्रँड अँबेसिडर श्रीकांत खंदारे पर्यावरण दूत सचिन सोनवणे संतोष राऊळ शरद हिवाळे अनुपमा मढे इतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.