आपला जिल्हा

निवडणूक पथकाने हस्तगत केली १ लाख १९ हजारांची रक्कम

मनिष जाधव 9823752964

निवडणूक पथकाने हस्तगत केली १ लाख १९ हजारांची रक्कम

शिर्डी प्रतिनिधी दि.२९ एप्रिल २०२४ -* श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली.

बँक

शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. नियमित तपासणी करत असताना नेवासा – श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूर कडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते.

ऊ
जाहिरात

शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अमोल शरद लांडे, सोमनाथ तुळशीराम बलमे, व्हिडिओग्राफर समीर हमीद शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!