आपला जिल्हा

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांना एक्सलन्स प्राचार्य पुरस्कार

मनिष जाधव 9823752964

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांना एक्सलन्स प्राचार्य पुरस्कार

तर अमृतवाहिनी संस्थेस उत्कृष्ट कार्यरत संस्थेचा मानाचा पुरस्कार

संगमनेर (प्रतिनिधी)–मा. शिक्षण मंत्री तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून. राष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश यांना एक्सलन्स प्रिन्सिपल – 2024 हा पुरस्कार मिळाला असून या महाविद्यालयास उत्कृष्ट कार्यरत संस्था हा पुरस्कारही मिळाला आहे.
न

नवी दिल्ली येथे एआयसीटीई नवी दिल्ली व एज्युस्किल्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कनेक्ट कॉनक्लेव्ह 2024 अंतर्गत प्राचार्य डॉक्टर यांना एक्सलन्स पुरस्कार या पुरस्काराने गौरवले. तर देश पातळीवरील पहिल्या शंभर महाविद्यालयांमधून गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या अमृतवाहिनी महाविद्यालयास उत्कृष्ट कार्यरत संस्था या पुरस्काराने गौरवले तर डॉ. शितल गुंडाळ यांना उत्कृष्ट संस्था समन्वयक म्हणून गौरविण्यात आले.

ए आय सी टी इ व एज्युस्किल्स फाउंडेशन यांच्या इंटरशिप पोर्टल अंतर्गत महाविद्यालयातील गुणवत्ता, निकाल, स्वच्छ व सुंदर परिसर, विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या आधुनिक सुविधा, ग्रंथालय, इंटरनेट, होस्टेल, मैदान, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची पात्रता तसेच संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नोकरीचे प्रमाण याबाबतचे मूल्यांकन नोंदविले गेले

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कंपन्यांशी टायप केला असून यामधून अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर नोकरी मिळाले आहेत. तसेच इंडस्ट्री संलग्न कौशल्य विकास प्रशिक्षण राबवला असून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामधून सर्वाधिक प्लेसमेंट देणारे अमृतवाहिनी हे महाविद्यालय ठरले आहे. याचबरोबर मायक्रोचिप आणि ज्युपियर नेटवर्क या दोन मल्टिनॅशनल कंपन्यांबरोबर सेंटर ऑफिस झाला आहे. या करारामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक इंटरशिप, प्रोजेक्ट यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभ घेता येणार आहे.

यापूर्वीही अमृतवाहिनी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सर्वाधिक गुणवत्तेचा ग्रामीण महाविद्यालय हा पुरस्कार मिळाला असून प्राचार्यना ही उत्कृष्ट प्राचार्य हा पुरस्कार मिळाला होता.

डॉ. व्यंकटेश यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!