आपला जिल्हामहाराष्ट्र

स्वच्छतादूतांचा सन्मान; प्रभाग क्र. ७ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप

मनिष जाधव 9823752964

स्वच्छतादूतांचा सन्मान; प्रभाग क्र. ७ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नगरसेविका गौरी पहाडे व माजी नगरसेवक मंदार पहाडे यांच्या वतीने, आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांना उपयुक्त साहित्याचे वाटप करून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

ओ

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, स्वच्छता कर्मचारी वर्ग हा शहराच्या आरोग्याचा कणा आहे. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून ते समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र कार्य करत असतात. त्यांच्या परिश्रमामुळेच शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहते.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी भविष्यातही आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यास आपण सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!