आपला जिल्हा

सहा वर्षांची वेदना, श्रद्धा आणि प्रतीक्षा संपणार

मनिष जाधव 9823752964

सहा वर्षांची वेदना, श्रद्धा आणि प्रतीक्षा संपणार

उद्या विवेक कोल्हे घेणार आमदार पदाची शपथ

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – राजकारणात निष्ठा, श्रद्धा आणि कार्यकर्त्यांचे समर्पण याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात; मात्र कोपरगाव तालुक्यातील वासुदेव शिदे यांनी दाखवलेली निष्ठा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हे परिवाराचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या वासुदेव शिदे यांनी “विवेक कोल्हे आमदार व्हावेत” या इच्छेसाठी तब्बल सहा वर्षे सहा महिने चप्पल न घालण्याचा संकल्प साईबाबांच्या चरणी केला होता.

वासुदेव
Oplus_16908288

या संकल्पामागे केवळ राजकीय भावना नव्हती, तर आपल्या नेत्यावरील निस्सीम प्रेम, विश्वास आणि श्रद्धेची भावनिक जोड होती. उन्हाळा, पावसाळा, थंडी अशा प्रत्येक ऋतूत अनवाणी राहून त्यांनी आपला संकल्प जपला. अनेकांनी त्यांना समजावले, आग्रह केला; मात्र “विवेक कोल्हे आमदार झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही,” या निर्धारावर ते ठाम राहिले.

विवेक

अखेर त्यांच्या श्रद्धेला यश मिळाले असून विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली आहे. गुरुवार, दिनांक १४ मे रोजी ते आमदार पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे वासुदेव शिदे यांची सहा वर्षे सहा महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. राजकारणात पदे येतात-जाता राहतात; मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील श्रद्धा, निष्ठा आणि नेत्यासाठी केलेला त्याग समाजाला प्रेरणा देणारा असतो. वासुदेव शिदे यांनी जपलेला हा संकल्प आज अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि निष्ठेचा जिवंत आदर्श ठरत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!