नगरपालिका निवडणुक 2025

संवादातून विश्वास, मार्गदर्शनातून विकास; प्रभाग ६ मध्ये मुकुंद भुतडा यांचा संपर्क

मनिष जाधव 9823752964

संवादातून विश्वास, मार्गदर्शनातून विकास; प्रभाग ६ मध्ये मुकुंद भुतडा यांचा संपर्क

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) :- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये उमेदवार मुकुंद भुतडा यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधत संवादातून विश्वास निर्माण करण्यावर भर दिला आहे. आमदार आशुतोष (दादा) काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत, त्याच धर्तीवर प्रभाग क्रमांक ६ चा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अ
काका कोयटे

या संपर्क दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज तसेच आरोग्य सुविधांबाबतच्या अडचणी मांडल्या. मुकुंद भुतडा यांनी प्रत्येक समस्या शांतपणे ऐकून घेत, “नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, नगरपरिषदेच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना केल्या जातील,” असा विश्वास दिला.

औ
Oplus_16908288

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी या संवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांनी स्वच्छ पाणी व आरोग्य सुविधांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या, तर युवकांनी रोजगार, क्रीडा व प्रशिक्षणाच्या संधींची मागणी केली. आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा उल्लेख करत, त्या सर्व योजना प्रभाग ६ पर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आश्वासन भुतडा यांनी दिले.
नागरिकांनीही “आमदार आशुतोष काळे यांच्या विकासदृष्टीमुळे कोपरगावमध्ये बदल होत आहेत. त्याच मार्गदर्शनाखाली काम करणारे मुकुंद भुतडा आमच्या प्रभागासाठी योग्य उमेदवार आहेत,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकूणच प्रभाग क्रमांक ६ मध्ये संवादातून विश्वास आणि मार्गदर्शनातून विकास हेच चित्र ठळकपणे दिसून येत असून, मुकुंद भुतडा यांच्या संपर्कामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!