
श्री चैतन्य टेक्नो स्कूल, कोपरगाव शाखेची NASA कार्यक्रमात गगनभरारी…!
कोपरगाव मनीष जाधव – “भविष्यात जर पृथ्वी नसेल, तर मानव कुठे जाईल?” या संकल्पनेवर आधारित नॅशनल स्पेस सेटलमेंट (NSS) या जागतिक पातळीवरील होणाऱ्या स्पर्धेसाठी श्री चैतन्य टेक्नो स्कूल, कोपरगाव शाखेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे. आणि त्यासाठी प्रोत्साहनपर मिळालेल्या विविध शैक्षणिक साहित्य व वस्तूंचे वितरण नुकतेच के. जे. सोमैय्या महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. बी. भोसले सर यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या विद्या विश्वनाथन मॅडम, अकॅडमिक डीन सागर पाटील,प्रोग्राम इनचार्ज नेहाराणी सोनवणे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. सर्वप्रथम प्राचार्या विद्या मॅडम यांनी आपले प्रास्ताविक सादर करताना सांगितले, की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती व जागतिक स्तरावर विचार करण्याची क्षमता विकसित होत आहे. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आपली परंपरा श्री चैतन्य टेक्नो स्कूल ने अधिक दृढ केलेली आहे.
डॉ. भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांची प्रेरणादायी कथा सांगून त्यांचे संशोधनातील अनमोल कार्य सांगितले. तसेच या उपक्रमाबद्दल कौतुक करताना म्हणाले, की या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि त्यांच्या जिज्ञासेला नवी दिशा मिळाली आहे.

कार्यक्रमाचा समारोप करतांना अकॅडमिक डीन सागर पाटील यांनी सांगितले, प्राचार्या विद्या मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 2 डिसेंबर रोजी NSS ओरिएंटेशन प्रोग्राम तसेच 12 डिसेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिर्डी व कोपरगाव शाखेतील १०० मुलांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी अंतराळातील संभाव्य मानव वसाहतींबाबत कल्पक संकल्पना सादर केल्या.
या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना NASA कार्यक्रम, अंतराळ संशोधन तसेच भविष्यातील स्पेस सेटलमेंट याविषयी शिर्डी शाखेचे शिक्षक प्रशांत जगताप यांनी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी सरोदे व आभार प्रदर्शन नियती पटेल या विद्यार्थिनींनी केले. या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेच्या संचालिका मा. सिमा मॅडम तसेच विभागीय व्यवस्थापक मा. गणेश सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.














