रूपालीताई चाकणकर अध्यक्षा महिला आयोग यांना पवार कुटुंब व चर्मकार संघाच्या वतीने निवेदन
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे :- तालुक्यातील शेडगाव येथील गरीब चर्मकार कुटुंबाचे मोहन पवार यांची अल्पवयीन मुलगी दि . २९ / ८ / २०२२ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार व संशयित आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सुध्दा अल्पवयीन मुलीचा शोध व आरोपी अटक होत नाही चौकशी करणेबाबत गुरूवार दि. २७/१०/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलना बाबत. मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलिस अधिक्षक साहेब अहमदनगर वरील विषयास अनुसरून शेडगाव ( श्रीगोंदा ) येथील मोहन सखाराम पवार यांची अल्पवयीन मुलगी दि २९ / ८ / २२ रोजी शाळेतून बेपत्ता झाल्याची घटना घडली असून सदर घटनेचा गुन्हा २९ / ८ / २०२२ रोजी दाखल झाला आहे. आज तब्बल ५० दिवस उलटून सुध्दा अल्पवयीन बेपत्ता मुलगी श्रीगोंदा पोलिस प्रशासनास सापडत नाही.
मुलीचे वडील मोहन पवार व कुटुंबिय यांच्या मुलीच्या चौकशी करिता वेळोवेळी विनवणी करीत असून. मोहन पवार यांची बेपत्ता मुलगी सापडत नाही व पोलिसांवर विश्वास राहिला नसल्यामुळे दि. १०/१०/२०२२ रोजी तहसिल कार्यालय , श्रीगोंदा येथे आमरण उपोषण केले व आत्मदहनाचा इशारा दिला त्यानंतर पोलिस प्रशासनाने आरोपीस मदत करणाऱ्या ८ लोकांवर अॅट्रॉसिटी व पोक्सो गुन्हा दाखल केला असून २० ऑक्टोबर पर्यंत अल्पवयीन मुलीचा शोध लावण्याचे व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत मुलीचा शोध लागला नाही व आरोपींना अटक झाली नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत. सदर घटने मध्ये मोठा आर्थिक व्यवहार व तडजोड झाल्याची शंका आहे. बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी तपास व इतर ठोस कारवाई केल्याची दिसून येत नाही . मुलीचा शोध व आरोपी अटक करण्यात टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे . म्हणून त्वरीत चौकशी करण्यात यावी. 1)बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध तात्काळ लावावा . २ ) गुन्हा दाखल झालेले ८ आरोपींना तात्काळ अटक करावे . ३ ) कर्तव्यात कसूर करणाऱ्या करणाऱ्यांचे निलंबीत करून त्यांची चौकशी करण्यात यावी, मोहन सखाराम पवार यांच्या कुटुंबास न्याय देण्यासाठी पोलिस प्रशासनास आदेश द्यावेत. आशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. या वेळी या वेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर,रामदास सोनवणे, रंगनाथ कानडे, निलेश झरेकर, सिमोन जगताप, विठ्ठल देवरे, अमर झिंझर्डे, अनिल जाधव, सयाजी शिंदे, विशाल पोटे, सूप्रिया काळे, कांतीलाल पवार, सुरेश पवार आदि चर्मकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.














