आपला जिल्हामहाराष्ट्र

यश प्राप्तीसाठी अभ्यासात सातत्य महत्त्वाचे _डॉ. गणेश दाभाडे

मनिष जाधव 9823752964

यश प्राप्तीसाठी अभ्यासात सातत्य महत्त्वाचे _डॉ. गणेश दाभाडे

अंदरसुल सचिन सोनवणे – अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स मध्ये करिअर मार्गदर्शन संपन्न झाले. बारावी सायन्सनंतर मेडिकल, इंजीनियरिंग, ऍग्री, औषधनिर्माण शास्त्र अशा विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधीबाबत के. के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथील प्राध्यापक डॉ गणेश भैरवनाथ दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपण या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि वेळेचे नियोजन कसे केले पाहिजे याबद्दल डॉ दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

ऐ
Oplus_16908288

अभ्यासात सातत्य, कठोर परिश्रम आणि सराव या त्रिसूत्रीचा वापर केल्यास यशप्राप्ती निश्चित होते असे डॉ गणेश दाभाडे यांनी विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून दिले. विशेष म्हणजे अभियांत्रिकी प्रवेश घेण्यापूर्वी लागणारे कागदपत्रे, आठ लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप सोबत मुलींसाठी ट्युशन फी मध्ये असलेली सवलत, नॉन क्रिमिलियरची वाढलेली उत्पन्न मर्यादा तसेच सीईटी सेल मार्फत या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांना दोनदा पीसीएम आणि पीसीबी परीक्षा देण्याची उपलब्ध झालेली संधी याबद्दल माहिती दिली, सीईटी सेल मार्फत राबवण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया आणि अभियांत्रिकी महाविद्यालय निवडताना घ्यावयाची काळजी याबद्दलही सखोल मार्गदर्शन केले. ऑटोनॉमस अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्राधान्य दिल्यास उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, आयडिया लॅब आणी कौशल्य विकास केंद्र या सर्वांमुळे चांगल्याप्रकारे प्लेसमेंट होते किंवा पुढील उच्च शिक्षण घेण्यास मदत होते असेही त्यांनी सांगीतले. त्याचसोबत रोबोटिक्स, केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, या शाखांविषयी सखोल माहिती दिली. तसेच के के वाघ महाविद्यालयामार्फत घेण्यात येणारा मोफत सीईटी क्रॅश कोर्स बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सुरुवातीस डॉ.दाभाडे यांचा प्रा. आर.बी. गायकवाड सर यांच्या हस्ते सत्कार व स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर भागवत यांनी केले. सदर मार्गदर्शन कार्यक्रमास प्राचार्य सचिन सोनवणे, प्रा. रूपाली जाधव (के के वाघ), सुनील सपकाळ, मयूर भागवत, गोकुळ वाणी, सचिन बोढरे, संदीप बोढरे, विजय भाटे, वैशाली शिंदे, निर्मला शिकारे, सुप्रिया कुळधर आदी कर्मचारी उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!