ACE फाउंडेशन नाशिक आयोजित भारतीय संविधानदिनानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत दुगलगाव येथील शिक्षक श्री योगेश माकोणे प्रथम
नाशिक सचिन सोनवणे -ACE foundation(मालेगाव) नाशिक हे कला, संस्कृतीक ,शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमाचे आयोजन वर्षभर करत असते भारतीय संविधान दिनानिमित्त ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य लेखनाचे आयोजन ACE फाउंडेशन तर्फे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेमध्ये राज्यभरातून online विविध कवींनी सहभाग घेतला होता.

काव्यलेखन स्पर्धा प्रमुख म्हणून छाया देसले मॅडम (उत्कृष्ट कवयित्री) मॅडम यांनी अायोजन- नियोजन केले होते सदरील स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुगलगाव ता. येवला जि. नाशिक या शाळेतील श्री योगेश बाळासाहेब माकोणे यांच्या ‘महती संविधानाची’ या कवितेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उत्कृष्ट कवयित्री दिपाली साळुंखे मॅडम यांनी कामकाज पाहिले.

श्री योगेश माकोणे हे काव्यलेखना बरोबरच मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत चारोळी लेखन उत्तम प्रकारे करतात तसेच विविध मासिकामध्ये सामाजिक, शैक्षणिक विषयावर लेखन करत असतात त्यांच्या स्वरचित काव्यसंग्रहाचे लवकरच प्रकाशन होणार आहेत त्यांच्या यशाबद्दल ACE फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष वैशाली भामरे मॅडम , दुगलगाव शाळेचे मुख्याध्यापक आर. के. धुमाळ सर,केंद्रप्रमुख काशिनाथ वाणी सर ,विस्ताराधिकारी सुनील मारवाडी साहेब, गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड साहेब तसेच सर्व शिक्षक मित्रपरिवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.














