प्रभाग 10 मध्ये मजबूत जोडीची एन्ट्री
माधवी वाघचौरे व डॉ. तुषार गलांडे अधिकृत उमेदवार

कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्वाची मजबूत जोडी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरली आहे. माधवी राजेंद्र वाघचौरे व डॉ. तुषार दादासाहेब गलांडे यांची नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी ओमप्रकाश दादाप्पा कोयटे. यांची अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जाहीर करण्यात आली असून, या घोषणेनंतर प्रभागासह शहरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



मागील पंचवार्षिक काळात प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना माधवी वाघचौरे व विरेन बोरावके यांनी केलेल्या विकासकामांचा ठसा आजही नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच महिलांच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतल्याने त्यांना अनुभवी व कामगार प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे विकासाला अधिक गती मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
यासोबतच समाजसेवेची वेगळी ओळख निर्माण केलेले डॉ. तुषार गलांडे हे युवा नेतृत्व म्हणून चर्चेत आहेत. आरोग्यविषयक जनजागृती, शिबिरे, गरजूंना मदत आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे त्यांचा प्रभागात चांगला दबदबा आहे. अनुभवी नेतृत्वासोबत नव्या विचारांची जोड मिळाल्याचे नागरिक सांगत आहेत.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनुभव व उत्साह यांचा समतोल साधणारी ही उमेदवारांची जोडी असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.














