
प्रभाग 07 मध्ये आज भाजपची मोठी हालचाल — आढाव व अजमेरे उमेदवारी अर्ज भरणार
कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 07 मध्ये भाजपकडून आज महत्वाची प्रक्रिया पार पडणार असुन भाजपचे उमेदवार प्रसाद बाळासाहेब आढाव आणि सोनल अजमेरे हे आज रविवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तसेच युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग संधान यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहे.

अर्ज भरण्याच्या या महत्त्वपूर्ण क्षणी सर्व नागरिक, समर्थक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप पक्षांसह मित्र पक्षांकडून करण्यात आले आहे. प्रभाग 07 मधील निवडणूक वातावरणाला यामुळे वेग येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेकडे स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहे.

आजचा अर्ज दाखल कार्यक्रम हा भाजपच्या निवडणूक मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, प्रभागातील राजकीय समीकरणांना पुढील दिशा मिळवून देणारा ठरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.












