प्रभाग ६ मध्ये मुकुंद भुतडा यांचा विजय निश्चित; आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष मार्गदर्शनाचा मोठा प्रभाव – तुषार जोशी

कोपरगाव (प्रतिनिधी) :- प्रभाग क्रमांक ६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) चे उमेदवार मुकुंद भुतडा हे विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि कार्यक्षम नेतृत्व आहे. त्यांच्या प्रचाराला आणि कार्याला आमदार आशुतोष काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत असून, याच मार्गदर्शनामुळे प्रभाग ६ मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया तुषार जोशी यांनी दिली.

जोशी पुढे म्हणाले की, “आमदार आशुतोष काळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली मुकुंद भुतडा हे प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर प्रभावीपणे काम करत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा यांसह सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा त्यांनी जनतेसमोर मांडला आहे. त्यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.

प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि संघटनात्मक ताकद पाहता, येणाऱ्या निवडणुकीत मुकुंद भुतडा यांचा विजय निश्चित असून हा विजय आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा परिणाम असेल, असा विश्वासही तुषार जोशी यांनी व्यक्त केला.














