आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

कोल्हे–संधान यांच्या दिशादर्शनाने उमेदवारांचे वातावरण भक्कम – कैलास सोमासे

मनिष जाधव 9823752964

कोल्हे–संधान यांच्या दिशादर्शनाने उमेदवारांचे वातावरण भक्कम – कैलास सोमासे

कोपरगाव मनिष जाधव – प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार राहुल खरात आणि स्वाती जपे यांच्या विकास आराखड्याला सामाजिक कार्यकर्ते कैलास सोमासे यांनी सकारात्मक दाद दिली असून, या उमेदवारांना मिळत असलेल्या नेतृत्वाच्या पाठबळालाही त्यांनी विशेष उल्लेखनीय ठरवले आहे.

ऊ
Oplus_16908288

प्रतिक्रिया देताना कैलास सोमासे म्हणाले की, राहुल खरात आणि स्वाती जपे हे प्रभागाच्या विकासासाठी ठोस आणि अभ्यासपूर्ण व्हिजन घेऊन समोर आले आहेत. विशेष म्हणजे ते युवा नेते विवेक भैय्या कोल्हे व पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी करत आहेत. त्यामुळे या प्रभागात तरुण नेतृत्वाची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

छख
Oplus_16908288

विवेक कोल्हे आणि पराग संधान ही दोन्ही नावे प्रभागातील युवकांमध्ये विश्वास आणि कार्यक्षमतेचे प्रतिक म्हणून ओळखली जातात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उमेदवारांची काम करण्याची दिशा अधिक स्पष्ट, योजनाबद्ध आणि उत्तरदायित्वपूर्ण झाली आहे. तसेच प्रभाग २ मध्ये रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, नालेसफाई अशा मूलभूत सुविधांच्या उभारणीला दीर्घकालीन धोरणाची गरज आहे. राहुल खरात व स्वाती जपे यांनी या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी दाखवली आहे. तरुण नेतृत्वाच्या मदतीने हा विकास आराखडा प्रत्यक्षात उतरू शकतो.
कैलास सोमासे यांच्या प्रतिक्रियेने प्रभागातील निवडणूक वातावरणात आणखी चैतन्य निर्माण झाले असून युवकांच्या नेतृत्वामुळे या प्रभागात सकारात्मक बदलाची अपेक्षा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!