आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

कोपरगाव नगरपरिषद स्वीकृत पदासाठी चुरस वाढली; दहा नावे चर्चेच्या केंद्रस्थानी

मनिष जाधव 9823752964

कोपरगाव नगरपरिषद स्वीकृत पदासाठी चुरस वाढली; दहा नावे चर्चेच्या केंद्रस्थानी

कोपरगाव प्रतिनिधी — कोपरगाव नगरपरिषदेत स्वीकृत सदस्य पदासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असताना शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे. नगरपरिषदेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, सत्ताधारी व विरोधकांकडूनही विविध पातळ्यांवर चर्चा व हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे.
ऊउ
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अतुल काले, तुषार पोटे, बबलू वाणी, विजय आढाव , सुनील गगुले, कृष्णा आढाव, सचिन परदेशी, सनी वाघ, रविंद्र पाठक आणि वैभव गिरमे ही आठ नावे सध्या स्वीकृत सदस्य पदासाठी आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे. सभागृहात आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता अभ्यासू व आक्रमक चेहरा नुकताच काँग्रेस पक्षातून पक्ष प्रवेश केलेले व विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वार विश्वास ठेऊन प्रभाग क्रमांक 11 मधून फॉर्म न टाकल्याने तुषार पोटे  आघाडीवर असल्याचे दिसते. या सर्वांनी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला असून, शहराच्या विकासाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे नगरपरिषदेत त्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकतो, अशी भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.
स्वीकृत सदस्य पदामुळे नगरपरिषदेतील संख्याबळात तसेच निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचा बदल घडू शकतो. त्यामुळे या निवडीकडे केवळ इच्छुकच नव्हे तर सर्वच राजकीय गटांचे बारकाईने लक्ष आहे. अंतर्गत बैठकांमधून संभाव्य नावांवर चर्चा सुरू असून, वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णयासाठी हालचाली सुरू असल्याचे समजते.

ऐ

सभागृहात आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता अभ्यासू व आक्रमक चेहरा नुकताच काँग्रेस पक्षातून पक्ष प्रवेश केलेले व विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वार विश्वास ठेऊन प्रभाग क्रमांक 11 मधून फॉर्म न टाकल्याने तुषार पोटे आघाडीवर असल्याचे दिसते. या सर्वांनी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला असून, शहराच्या विकासाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे नगरपरिषदेत त्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकतो, अशी भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरातील नागरिकांमध्येही या निवडीबाबत उत्सुकता आहे. विकासकामे, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नियोजन यांसारख्या प्रश्नांवर सक्षम व अनुभवी व्यक्तीची निवड व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता असून, या निर्णयाचा नगरपरिषदेच्या आगामी वाटचालीवर मोठा प्रभाव पडणार आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!