सोमय्या विद्यामंदिर साखरवाडी शाळेचे यश
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित पुणे विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा पॅव्हेलीयन पार्क,सोलापूर येथे दिनांक 9 व 10 सप्टेंबर 2024 या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने( प्रसाद मयुरी जानकीराम, मोरे साधना पोपट,प्रसाद मनीषा जानकीराम, जाधव श्रेया श्रीकांत, भडांगे वैशाली सुनील) सलग तिसऱ्या वर्षी पुणे शहर संघाला पराभूत करून पुणे विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले व दिनांक 23 ते 25 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत झेप घेतली आहे .या राज्यस्तरीय स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींचा संघ संपूर्ण पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.
14 वर्षाखालील मुलींच्या संघानेही या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले आहे ( झालटे प्रियांशी,मोरे साक्षी, वाघ अनुष्का,शिरसाठ तन्वी, हिवरे तनुजा) सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सोमैया सचिव सुहासजी गोडगे, प्राचार्य सौ. सुनीता पारे, स्पोर्ट्स अकादमीचे प्रमुख एझाझ सर,आदित्य सर यांचे सहकार्य लाभले.तसेच क्रीडाशिक्षक अमोलिक सर व बागूल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक अमोलीक सर यांचे कोपरगांव तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम,उपाध्यक्ष. निलेश बडजाते,सुधाकर निलक, सचिव अनुप गिरमे, जिल्हा संपर्क प्रमुख शिवप्रसाद घोडके, सदस्य, सर्व क्रीडा शिक्षक,पंचक्रोशीतील नागरिक यांनी अभिनंदन केले आहे..