आपला जिल्हा

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेनुकाताई विवेक भैय्या कोल्हे यांचा जन्मदिवस दिमाखात साजरा!

संपादक मनिष जाधव 9823752964

त
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेनुकाताई विवेक भैय्या कोल्हे यांचा जन्मदिवस दिमाखात साजरा!
कोपरगाव प्रतिनिधी – संजीवनी  इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे यांचा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.. यात शाळेतील के. जी पासुन दहावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या समंधित वर्ग शिक्षक, शिक्षिका यांच्या सकार्याने प्रत्येक वर्गात आकर्षक डेको रेशन करुन सजावट केली होती..
येवढेच नव्हे तर संपूर्ण वर्गात केक कापून तसेच शुभेच्छा कार्ड देउन रेणुका मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.मुख्य कार्यक्रम शाळेच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता यात शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर यांनी रेणुका ताई यांना आपल्या भाषणातून खुप उद्बोधक शुभेच्छा दिल्या.शिक्षक वृंद पैकी कैलास बहिरट सर, दिपक बोळिज सर, अनुप गिरमे सर यांनी रेणुका ताई यांना आपल्या भाषणातून खुप छान शुभेच्छा दिल्या.. इयत्ता नववीतील विद्यार्थीनी यांनी स्वागत गित आणि शुभेच्छा गीत सादर करुन कार्यक्रमाला शोभा वाढवली. इयत्ता दहावी वर्गातील कुमारी. आदिती वल्टे व रविना जोधा या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्राचार्य मोहसीन शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!