श्री मोहिनीराज यात्रा उत्सव निमित्त नेवासा पोलीस स्टेशन व गृह रक्षक दलाच्या वतीने झेंडा.
नेवासा मोहन गायकवाड – नेवासा नगरीचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मोहिनीराजांची यात्रा उत्सवाच्या निमित्ताने नेवासा पोलीस स्टेशन व गृह रक्षक ददलाच्या वतीने प्रशासकीय मानाच्या झेंडयाचे पूजन पोलीस निरीक्षक विजय करे व तालुका समादेश अधिकारी बाळासाहेब देवखिळे यांच्या हस्ते करण्यात आले व झेंडा श्री मोहिनीराजांच्या कळसावर चढविण्यात आला
यावेळी महिला पोलीस कर्मचारी व महिला होमगार्ड यांच्या वतीने ध्वजाला पंचारती ओवाळून औक्षण करण्यात आले.
तसेच वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत श्री मोहिनीराजाच्या नावाचा जयघोष करत नेवासा पोलीस स्टेशन ते मोहिनींराज मंदिर पायी जाऊन मंदिरावर झेंडा चढविला
यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे , समादेश अधिकारी बाळासाहेब देवखिळे, पोलीस उपनिरीक्षक भोंबे,पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक गावंडे, पोलीस हवालदार तुळशीराम गीते, पोलीस हवालदार कोळपे, पोलीस नाईक कुदळे, पोलीस कॉन्स्टेबल आव्हाड, जाधव, चालक कुऱ्हाडे, महिला पोलीस कर्मचारी सविता उंदरे,
मोहन गायकवाड पलटण नायक दिलीप गायकवाड, श्रीकांत ससे, अंशकालीन लिपिक अल्ताफ शेख , संतोष गायकवाड , शशी चक्रनारायण, राजेंद्र बोरुडे, गफ्फार शेख अशोक चव्हाण विठलं जाधव, उमेश इंगळे, किशोर शिंदे, सर्जेराव जगधने, अरुण देवढे, महिला होमगार्ड रुक्मिणी सरोदे, सुनंदा कवडे, मनीषा खादे, प्रियंका निर्मळ, प्रतिभा श्रीखंडे, संजय चांदणे यांच्या सह मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी व गृह रक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते