आपला जिल्हा

लालाय्लू’चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न 

मनिष जाधव 9823752964

 ‘लालाय्लू’चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न 

संगमनेर प्रतिनिधी – नुकताच गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी ‘लालाय्लू’ या बृहद कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

अ
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज,संगमनेर या शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज संगमनेर येथे कार्यरत असलेले प्रा.संतोष भालेराव लिखित ‘लालाय्लू’ या बृहद कादंबरीचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष मा. आ.डॉ. सुधीरजी तांबे साहेब यांचे हस्ते संपन्न झाले. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे सह सेक्रेटरी मा.बाबुराव गवांदे सर, संगमनेरातील ज्येष्ठ साहित्यिक मा. रा. लामखडे,मा. प्राचार्य विठ्ठल शेवाळे, प्रा. डॉ.राहुल हांडे प्रा. डॉ. रोहित कावळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

औ
सदर प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.तांबे साहेबांनी नवोदित लेखक प्रा. संतोष भालेराव यांच्या लेखण शैलीचे विशेष कौतुक केले.
खाजगीकरणाला पोषक असणारे जे विनाअनुदानित धोरण गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेले आहे, ते अत्यंत जुलमी आणि शोषणकारी आहे. विनाअनुदानित शिक्षण पद्धती आणि त्यात भरडला जाणारा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्ग यांचे यथार्थ वर्णन या कादंबरीत आढळते.

झज
महाराष्ट्रातील सध्याच्या अत्यंत ज्वलंत अशा प्रश्नावर या कादंबरीने प्रकाशझोत टाकला असल्याकारणाने ती नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
संस्थेच्या संचालिका सौ दुर्गाताई तांबे यांनी कादंबरीतील ग्रामीण शैलीतील शब्दांचे विशेष कौतुक केले व लेखनाबद्दल लेखकाचे भरभरून कौतुक केले. लेखक प्रा.संतोष भालेराव यांनी या कादंबरीद्वारे शिक्षणासारखा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलेला आहे, त्यांच्या या प्रयत्नाचे ताईंनी स्वागत केले.
या कार्यक्रम प्रसंगी बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त माननीय मधुकर सोनवणे, राजहंस दूध संघाचे मा. चेअरमन आर.बी. शेठ राहाणे, कारखान्याचे मा. संचालक शांताराम पाटील कढणे, विद्यमान संचालक विजुशेठ राहाणे, मा. प्राचार्य, प्रा. एम. वाय. दिघे, प्रा डी. टी. गुंजाळ, प्रा एस. वाय. उगले, एस. एम. बी. एस. टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. डी. वाघ, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. कोल्हे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. के.जी. खेमनर, उपप्राचार्य प्रा. एस. पी. सुरसे, शिक्षिका प्रतिनिधी कमरून्नीसा सय्यद, शिक्षकेतर प्रतिनिधी सुदाम आव्हाड,दोन्हीही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, तसेच समाजातील विविध घटकांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लेखकाचा परिचय प्रा.नवनाथ गुंड यांनी करवून दिला,तर आभार उपप्राचार्य प्रा. एस. पी.सुरसे यांनी मानले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!