राष्ट्रीय जंतनाशक मोहिमे अंतर्गत भा.गुं.पा.सह्याद्री विद्यालयात जंतनाशक गोळ्यांचे वाटप
संगमनेर प्रतिनिधी – केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय जंतनाशक मोहिम आज विद्यालयात राबविण्यात आली.या प्रसंगी मा.राहुल शेळके साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्या नगर यांच्या हस्ते मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा अनिल नागणे साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे सह सेक्रेटरी मा. दत्तात्रय चासकर सर , संस्थेचे रजिस्ट्रार बी.आर.गवांदे सर, आरोग्य पर्यवेक्षक मा.देशमुख साहेब, आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती धुमाळ मॅडम,त्याच प्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य खेमनर के.जी.सर, पर्यवेक्षक पवार सर , पर्यवेक्षिका श्रीमती रणशूर मॅडम, शिक्षक खेमनर एस..एम.सर, देशमुख के.डी.सर, अभंग आर.एल.सर , मिलिंद औटी सर, जालिंदर नाईक सर, उपस्थित होते.
श्रीमती वायाळ मॅडम, तसेच आरोग्य विभागातील सेवकवृंदचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले. जंतनाशक गोळ्यांच्या उपक्रमाची उपयुक्तता मुलांना समजावून सांगितली.या कार्यक्रमानंतर मा.शेळके साहेब व मा.नागणे साहेब यांनी डिजिटल क्लासरूमला भेट देऊन अध्ययन -अद्यापन कार्यात डिजिटल बोर्डाचा वापर कसा होतो याविषयी माहिती घेतली.
अटल लॅबला भेट देऊन विद्यार्थी करत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती घेऊली त्याच प्रमाणे विद्यालयातील सुसज्ज ग्रंथालयास , अभ्यासिकेला व संगणक लॅब ला सदिच्छा भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच विद्यालयातील सभागृह व जिमखान्याची पाहणी केली. शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.