आपला जिल्हा

योग हाच स्वस्थ आरोग्याचा पासवर्ड – प्राचार्या नेहा पहाडे

संपादक मनिष जाधव 9823752964

योग हाच स्वस्थ आरोग्याचा पासवर्ड – प्राचार्या नेहा पहाडे

कोपरगाव मनिष जाधव – योग परंपरा म्हणजेच ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, पातंजल योग, कुंडली योग, हट्टयोग, ध्यानयोग, मंत्रयोग, राजयोग, जैनयोग या सारख्या अनेक परपंरा आहे. ज्या परंपरेने मानवी जीवन विकासाच्या रचनात्मक कार्यात मौलिक योगदान दिलेले असुन योग हाच स्वस्थ आरोग्याचा पासवर्ड असल्याचे मत ब्राईट माईंड्स ग्लोबल स्कूल व पोदार जम्बो किड्स स्कूलचे प्राचार्या नेहा पहाडे यांनी व्यक्त केले.

अअशोकराव रोहमारे फाउंडेशन संचालित ब्राईट माईंड्स ग्लोबल स्कूल व पोदार जम्बो किड्स स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव रोहमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित अशोकराव रोहमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संकुलात जागतिक योग दिन आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे कोपरगाव येथील योग प्रचार प्रसार संस्थेचे अध्यक्ष तथा योगा शिक्षक दत्ता पुंडे तसेच सुप्रसिद्ध डाॅ. अनिकेत कृष्णाणी, प्राचार्या नेहा पहाडे, पोदार जम्बो किड्स स्कूल प्रमुख आरती बंब यांच्यासह आदि मान्यवरांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.

प्राचार्या नेहा पहाडे बोलताना म्हणाले की, योगविद्या ही केवळ आरोग्य व शरीर स्वास्थाशीच निगडीत नाही, तर ती माणसाच्या मानसिक, आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीचा राजमार्ग आहे. याची जाणीव आता विश्वव्यवस्थेला झाली म्हणुन भारताचे प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रथम योग विद्येची संकल्पना जगासमोर मांडली व संपूर्ण विश्वाला उद्देशून भारतीय पौराणिक ज्ञान अर्थात योगाचे महत्व प्रतिपादीत केले. योग भारताच्या प्राचीनतम परंपरेचा एक अमूल्य ठेवा आहे. योग हा मेंदू आणि शरिर यांचे एकमेचे प्रतीक आहे. योगाचे अनेक पारंपारिक योग संप्रदाय आहेत ज्यांनी आपला वेगवेळा मार्ग प्रशस्त केला असला तरी प्रत्येक योगा परंपरेने शेवटी मानवी जीवन विकासाच्या मुळ जाण्याचा केलेला यातप्रमुख संप्रदाय, उद्देशपर्यंत प्रयत्न आहे. योग परंपरा म्हणजेच ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, पातंजल योग, कुंडली योग, हट्टयोग, ध्यानयोग, मंत्रयोग, राजयोग, जैनयोग या सारख्या अनेक परपंरा आहे. ज्या परंपरेने मानवी जीवन विकासाच्या रचनात्मक कार्यात मौलिक योगदान दिले आहे.पतंजलीने सांगितलेला अष्टांग योगाचा प्रत्येक प्रकार अतिशय शाख शुध्द जीवन विकासाची गुरुकिल्ली आहे. यम, निमय, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या क्रमाने मनुष्य जीवनाची अलौकिक परंपरा ठरवुन दिली असुन माणुस आणि निसर्ग, प्रकृति या दोघांमध्ये एक सामंजस्य निर्माण करणारी जीवन पध्दती आहे. औषधोउपचारा सोबत अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी योगाभ्यास फायदेशीर ठरत आहे विशेष म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी योग खुप महत्त्वाचा असल्याचे प्राचार्या नेहा पहाडे यांनी सांगितले.

ऐ

योग प्रचार प्रसार संस्थेचे अध्यक्ष तथा योगा शिक्षक दत्ता पुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो ; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. भारतातील योगाची संस्कृती जागतिक पातळीवर स्वीकारली गेली आहे. जगभरातील देशांनी योग केवळ स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला असल्याचे पुंडे यांनी सांगितले. या योग विशेष दिनानिमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे धडे घेतले विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी योगासने केली.यावेळी स्कुलचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!