आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील युवक राहुल खरात नगरसेवक पदासाठी इच्छुक — नागरिकांमध्ये वाढता उत्साह

मनिष जाधव 9823752964

प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील युवक राहुल खरात नगरसेवक पदासाठी इच्छुक — नागरिकांमध्ये वाढता उत्साह

जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला प्रामाणिक चेहरा चर्चेत

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव — कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची सरगर्मी वाढू लागली असून, प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील व विवेक भैय्या कोल्हे यांचा निष्ठावंत कार्याकर्ता म्हणून ओळखले जाणारे राहुल खरात यांचे नाव पुढे येत आहे. सामाजिक कार्यातून आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने केलेल्या कामामुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

राहुल खरात हे साध्या कुटुंबातून पुढे आलेले युवक असून, त्यांच्या मनात “सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवणं” हा एकच उद्देश आहे. नागरिकांच्या छोट्या-छोट्या अडचणींना गांभीर्याने घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे.

राहुल खरात
Oplus_16908288

रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी नगरपरिषदेपुढे विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. स्थानिक तरुणांबरोबर समाजहिताचे उपक्रम राबवून त्यांनी युवकवर्गात चांगली पकड निर्माण केली आहे.

रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, शैक्षणिक मदत अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजसेवेचा नवा आदर्श घालून दिला आहे. प्रभागातील नागरिक, महिला वर्ग आणि तरुण मंडळी यांच्याकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या साधेपणामुळे आणि प्रामाणिक स्वभावामुळे अनेकांना ते आपले वाटतात.

आगामी निवडणुकीत राहुल खरात “प्रामाणिक सेवा, खरा विकास” या घोषवाक्याखाली नागरिकांच्या भेटी घेत असून, प्रत्येक घरात आपली भूमिका मांडत आहेत. अनेक नागरिक त्यांना “प्रामाणिक, तरुण आणि काम करणारा चेहरा” म्हणून पाहत आहेत.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!