पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत
पोहोचवण्यासाठी काम करणार – बापू रांधवणे
कोपरगाव तालुक्यात संघटना वाढीसाठी माजी राज्यमंत्री आ.प्राजक्तदादा तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार तसेच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार – नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बापू रांधवणे
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यांत कायमच अग्रेसर असलेले कोपरगाव तालुक्यातील गोधोगाव येथील प्रगतशील शेतकरी बापू रांधवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून माजी राज्यमंत्री आ.प्राजक्तदादा तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून सर्वच स्तरातून बापू रांधवणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बापू रांधवणे यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सत्कारास उत्तर देताना बापू रांधवणे बोलताना म्हणाले की, पक्षाने माझ्यावर दिलेली जवाबदारी स्विकारली असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी काळात कोपरगाव तालुक्यात संघटना वाढीसाठी माजी राज्यमंत्री आ.प्राजक्तदादा तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार तसेच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बापू रांधवणे यांनी सांगितले. यावेळी ओ.बी.सी सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष राहुल राऊत, संतोषजी वढणे, ॲड. रमेशजी गव्हाणे, सुरेशजी आसने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सुनील वर्पे, निखिल थोरात, ऋतुराज काळे आदी संख्येने उपस्थित होते.