एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल, सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियंका मोहिते (आय.पी.एस.) या होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते ध्वज रोहन करून करण्यात आले. यानंतर सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय अमोल आहेर यांनी उपस्थितांना करून दिला. यानंतर संकुलाच्या वतीने प्रियंका मोहिते (आय.पी.एस.), डॉक्टर निकिता मोहिते व रोशन मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मंथन परीक्षेत चमकदार कामगिरी करणारे विद्यार्थी अनुक्रमे इयत्ता तिसरी समृद्धी सचिन सोनवणे (केंद्रात द्वितीय), राजवीर अमोल सोनवणे (केंद्रात तृतीय), इयत्ता पाचवी खदीजा अल्ताफ खान (केंद्रात द्वितीय), स्वरा मयुर सोनवणे (केंद्रात तृतीय), इयत्ता सहावी वैष्णवी सुरेश आहेर (केंद्रात प्रथम) यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रियंका मोहिते यांनी आपल्या भाषणात नियमित अभ्यास, जिद्द ,चिकाटी केल्याने यश हमखास मिळते असे नमूद केले.यानंतर डॉ.निकिता मोहिते यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी शाळेची कॅन्टीन पेक्षा शाळेच्या ग्रंथालयाचे जास्त लाभ घ्यावे, आपला वेळ वाया न घालवता ते आपल्या अभ्यासासाठी वापरावे. अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पालकांनी 100% मतदान करावे व आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना पण मतदान करण्यास सांगावे.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे ,खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक जीवन शेठ गाडे, आकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे तसेच रामनाथ काका एंडाईत, बाबासाहेब सोनवणे, इंग्लिश मीडियमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, जुनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, अजीम पटेल, गणेश सोनवणे, सचिन घोडके, पारस भगत, राजेश कांबळे, सुनील सपकाळ, संदीप बोढरे, जितेश व्यवहारे, मयूर भागवत, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुनीता वडे, सुषमा सोनवणे, कांचन गायकवाड आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.