
आर.जे.एस. फार्मसीच्या कॉलेजच्या वतीने फार्मसीस डेनिमित्त पुरस्कार जाहीर
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यात अल्पावधीतच नावारूपाला आलेले राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने फार्मासिस्ट दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय जनार्दन स्वामी कॉलेजच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील औषध वितरण, रुग्णांना योग्य मार्गदर्शन तसेच सेवाभाव या कार्यात सतत कार्यरत राहणाऱ्या फार्मासिस्टांचे योगदान महत्वाचे आहे. यातही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य जनजागृती विशेष योगदान देणारे



श्री. सुरेंद्रजी दलिचंद ठोळे ( स्वस्तिक मेडिकल) यांना जीवनगौरव पुरस्कार तर बेस्ट फर्मासिस्ट अवॉर्ड पुरुष विभाग मध्ये श्री सुमित दिलीप चांदगुडे (जगदंबा मेडिकल, चास नळी), व बेस्ट फर्मासिस्ट अवॉर्ड महिला विभाग मध्ये सौं भारती अनिल कोळपे ( हरिओम मेडिकल स्टोअर, कोळपेवाडी ) यांना जाहीर करण्यात आला असून यांचा सन्मान गुरूवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी औषधं निरीक्षक श्री सोमनाथजी मुळे, यांच्या हस्ते व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन चे अध्यक्ष चांगदेवराव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, विश्वस्त दिपक कोटमे, विश्वस्त व उद्योजक विजय कडू, विश्वस्त श्री प्रणित कातकडे , कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन, उपप्राचार्या सौ उषा जैन, प्रा.डॉ. विजय जाधव, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सन्मान करण्यात येणार आहे.













