झेंडा लावण्याच्या कारणावरून दगडफेक ; दोन जखमी
दादा सोनवणे श्रीगोंदा प्रतिनिधी :– श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी झेंडा लावण्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात त्यांना होऊन दगडफेक झाल्याचा प्रकार घडला असून यात अंदाजे दोन ते तीन जण जखमी झाले आहेत अशी माहिती आहे याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी अनेक लोक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गर्दी करून होते.
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी कबरस्थान जवळ झेंडा लावण्याच्या कारणातून किरकोळ बाचाबाची होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली असून यात दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांचेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात हजर होते मात्र गुन्हा दाखल होणार अशी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात असल्याने येणाऱ्या अनेक उत्सवावर याचे पडसाद पडू शकतात त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सावध भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे असेही नागरिकांतून बोलले जात आहे.