दिपक (आण्णा) लंके यांच्या अभ्यासू मध्यस्थी मधुन पिंपळनेर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण मागे !
आगार प्रमुख श्री.पराग भोपळे यांनी पिंपळनेर ग्रामस्थांच्या मागण्या वर घेतला सकारात्मक निर्णय !
निघोज प्रतिनिधी संदिप गाडे – पारनेर एस.टी. आगाराच्या अनियमित फेऱ्या विरोधात विद्यार्थी व ग्रामस्थांची होणारी हेळसांड लक्षात घेता व वारंवार पारनेर आगाराशी पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सोमवारी पिंपळनेर ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. आगर प्रमुख श्री पराग भोपळे साहेब यांना बस सेवापूर्ववत सुरू करणे संदर्भात वेळोवेळी निवेदन व प्रत्यक्ष भेटून अर्ज दिले आसतानाही अनियमीतता आढळून आली .

पारनेर आगार प्रमुखांच्या आडमुठे धोरणाचा जाहीर निषेध करत या वेळी श्री. निलेशशेठ लटांबळे मा.नगराध्यक्ष शिरूर उपसरपंच सौ.साधनाताई हजारे सौ. राजश्री खामकर यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा जाहीर दिला.
परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार निलेशजी लंके यांचे जेष्ठ बंधु दिपक आण्णा लंके यांनी ग्रामस्थांच्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करत अभ्यासू मध्यस्ती करत आगार प्रमुख भोपळे व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधत आभ्यासु तोडगा काढत बुधवार पासुन सर्व बस फेर्या ठरल्या प्रमाणे नियमीत सुरु होतील व बसचा चालक प्रत्येक फेरीत पिंपळनेर बस थांब्यावर बसची नोंद रजिष्टर करेल आसे आगार प्रमुख भोपळे यांनी दिपक लंके व पिंपळनेर ग्रामस्थांना आश्वासित करत उपोषण कर्त्यांना उपोषण लिबु सरबत देत मागे घ्यावयास लावले .
यावेळी उपोषन करते मान्यवरांसमवेत सरपंच देवेंद्र लटांबळे , सुभाष गाजरे , दत्तात्रय लटांबळे , सिताराम कळसकर , साधनाताई हजारे , मधुकर तुळशीराम कळसकर सर भालेकर , गोपाळ काका मकाशीर , बापू कांबळे , राजश्री खामकर,कल्पना गाजरे , गोकुळ रासकर , रूपाली कळसकर , सीमा भालेकर , काजल देंडगे , विवेक काळोखे , भाऊ सोनवणे,अक्षय पोटे किरण खुपटे, एस बी रासकर सर संपतराव सावंत पोपट रासकर , भाऊसाहेब खामकर बबन साबळे बाळासाहेब गाडे पांडुरंग रासकर दीपक कळसकर राजेंद्र सोंडकर यासह पिंपळनेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .