संजिवनी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रंगोत्सव स्पर्धेस उत्तम प्रतिसाद
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाढ मिळण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी रंगोत्सव स्पर्धा अतिशय प्रभावी माध्यम असल्याने संजिवनी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्कूलचे मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी इयत्ता १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात होते सदर स्पर्धेस 450 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग होवुन आपल्या सृजनशीलतेचा अप्रतिम आविष्कार रंगांद्वारे सादर केला.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती कल्पना शक्तीचे उत्तम प्रदर्शन होते. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना रंग देण्याची संधी मिळाली. सर्वांसाठी ही एक संस्मरणीय आणि आनंददायी स्पर्धा ठरली. आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सव स्पर्धेची माहिती स्कूल चे प्राचार्य मोहसीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आयोजित करण्यात आलेली रंगोत्सव स्पर्धा उपक्रमाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे, शाळेचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई कोल्हे यांनी कौतुक केले. सदरची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चित्रकला शिक्षक श्री. पोल सर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.