कॅनलला पाणी आल्याने नगरपालिकेने कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा ४ दिवसाआड पूर्ववत करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
कोपरगाव प्रतिनिधी – एकीकडे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आल्याचे दिसत आहे व दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिना जवळ आला, तरी कोपरगाव शहराला पिण्यासाठी १२ दिवसा आड पाणी मिळत धरण भागात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला व नांदूर मधमेश्वर मधून कॅनलला पाणी सोडले आहे.
त्यामुळे नगरपालिकेने ४ दिवसाआड म्हणजे ५ व्या दिवशी पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा . जेणेकरून महिला भगिनींना नागरिकांना झालेल्या पाण्याच्या त्रास थांबेल.
गेल्या तीन महिन्यापासून साधारण नागरिकांना गडूळ दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी येत होते. त्यामुळे नगरपालिकेने शहरात असणारे फिल्टरेशन प्लांट/ पाणी शुद्धीकरण केंद्र यावर लक्ष ठेवून पाणी स्वच्छ नागरिकांना पुरवावे. जेणेकरून पावसाळ्यात होणारे पाण्यामुळे चे आजार हे होणार नाही , याची काळजी ही नगरपालिकेने प्रशासनाने घ्यावी. नगरपालिकेने पाणी दिवस अचानक पणे वाढवायची वेळ येऊ नये यासाठी लक्ष ठेवून सातत्याने चार दिवस आड कसा पाणीपुरवठा कायमस्वरूपी राहील याची काळजी घ्यावी.