जैन मुनींचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत
चातुर्मास कार्यक्रम कोपरगावमध्ये घेण्याची केली विनंती
कोळपेवाडी वार्ताहर :- पाच वर्षानंतर बुधवार (दि.१९) रोजी संत शिरोमणी प.पु.१०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य असलेल्या जैन मुनींचे कोपरगावात आगमन झाले. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी त्यांचे कोपरगावकरांच्या वतीने स्वागत केले व पूजन करून आशीर्वाद घेतले.
संत शिरोमणी प.पु.१०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य संत श्री परमपूज्य १०८ श्री अक्षयसागरजी महाराज, परमपूज्य १०८ श्री नेमीसागरजी महाराज, परमपूज्य १०८ श्री शैलसागरजी महाराज, परमपूज्य १०८ श्री अचलसागरजी महाराज व ऐलक परमपूज्य १०५ श्री उपशमसागरजी महाराज यांचे बुधवार रोजी कोपरगावनगरीत आगमन झाले. यावेळी असंख्य जैन समाज बांधव व जैन मुनी समवेत आ. आशुतोष काळे यांनी टाकळी नाका ते कोपरगाव शहरातील महावीर भवन पर्यंत पायी प्रवास केला. सर्व जैन मुनींचे महावीर भवन या ठिकाणी आ. आशुतोष काळे यांनी आरती करून मनोभावे पूजन केले.यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, जैन मुनींचे चरण स्पर्श कोपरगावच्या भूमीला होत आहे हे कोपरगावकरांचे भाग्य आहे. कोपरगावकर नेहमीच सर्व धार्मिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे यावर्षी होणारा चातुर्मास कार्यक्रम कोपरगाव मध्ये घेवून कोपरगावकरांना सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती कोपरगावकरांच्या वतीने व समस्त जैन समाजाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी जैन मुनींकडे केली.
यावेळी समाजाचे पंच अशोक पापडीवाल, महावीर दगडे तसेच सर्व ट्रस्टी, अजित लोहाडे, कैलास ठोळे, दिलीप अजमेरे, नितीन कासलीवाल, अजित काले, सी.डी. ठोळे, सचिन ठोळे, राजाभाऊ अजमेरे, सुनील बोरा, राजाभाऊ फुलफगर, सचिन अजमेरे, अतुल काले, महावीर काले, परेश पांडे, विशाल ठोळे, योगेश गंगवाल, प्रीतम गंगवाल, नीरज कासलीवाल, सुयोग ढोले, अशोक गंगवाल, राजाभाऊ गंगवाल, गोकुळ गंगवाल, पियुष गंगवाल, सुमित लोहाडे, संतोष गंगवाल, आनंद काले, डॉ. मयुर गंगवाल, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, राजेंद्र वाकचौरे, कलविंदरसिंग डडीयाल, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, शैलेश साबळे, ऋषीकेश खैरनार, अक्षय आंग्रे, किरण बागुल,राजेंद्र आभाळे, रामदास केकाण, तेजस साबळे, एकनाथ गंगूले, आकाश गायकवाड, दिनेश पवार, गणेश बोरुडे, सचिन गवारे, मनोज नरोडे, रोशन शेजवळ, दिलीप पोटे, सिद्धेश होले, दादा पोटे, अमोल वाघडकर, रितेश राऊत, सोमा शिंदे, तुषार चिकणे, समर्थ दीक्षित आदींसह जैन बांधव उपस्थित होते.