होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा उत्साही कार्यक्रम होणार
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव शहरातील महिला वर्गासाठी आनंदाची बातमी! शहरात लवकरच “होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा आकर्षक आणि मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. महिलांसाठी खास ठेवलेला हा कार्यक्रम उत्साह, आनंद आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम ठरणार असून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन अनिरुद्ध काळे व सोमनाथ आढाव यांनी केले आहे .
या उपक्रमाचे आयोजन नवरात्रौत्सवानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वतीने महिलांसाठी खास आकर्षक कार्यक्रम गुरूवार , दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी महादेव मंदिर, निवारा हौसिंग सोसायटी निवारा या ठिकाणी सायंकाळी ०७ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे — प्रश्नमंजुषा, गृहकार्यातील कौशल्य स्पर्धा, हास्यस्पर्धा, नृत्यसादरीकरण, तसेच “खेळ पैठणीचा” हा मुख्य आकर्षण असलेला उपक्रम महिलांच्या उत्साहात भर घालणार आहे. विजेत्या महिला सहभागीला सुंदर पैठणी साडी देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमात महिलांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संवादकौशल्य प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच उपस्थित पाहुण्यांकडून प्रेरणादायी मार्गदर्शनही केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळाकडून जोरदार तयारी सुरू असून, परिसरातील महिलांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक महिलांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत, तसेच अधिक माहिती साठी अनिरुद्ध काळे व सोमनाथ आढाव यांच्या संपर्क साधावा.
नाव नोंदणी ठिकाणे:
राजेंद्र पाखले बेकर्स, मार्केट रोडसाईरूप टेलीकॉम, रुपेश वाघचोरे, निवाराअर्थव जनरल स्टोअर, निवारा – किशोर कुलकर्णीविनोद भोरात आईसक्रीम पार्लर, जानकी विश्व