११वी च्या विद्यार्थ्यांचे सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये भव्य स्वागत!
संगमनेर प्रतिनिधी मनिष जाधव – भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या ११वीच्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब फुलांनी करून त्यांना भावी शिक्षण प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी कॉलेजचे प्राचार्य के. जी. खेमनर सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले की, “कॉलेज जीवन ही केवळ पुस्तकी शिक्षणाची वेळ नसून एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. याचा सकारात्मक उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे.”
कार्यक्रम प्रसंगी कॉलेजचे उपप्राचार्य संजय सुरसे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करत कॉलेज विषयी माहिती करून दिली.वाणिज्य शाखेतील बदलत्या नावीन्यपूर्ण संधीबद्दल वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए. के. दातीर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. एन. एस. गुंड, आय. टी. विभाग प्रमुख प्रा. बी. टी. दिघे, प्रा. रोझा देशमुख, प्रा. सुलोचना कुटे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. नवीन विद्यार्थ्यांना कॉलेजच्या शिस्त, शिक्षणपद्धती आणि उपक्रमांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाने सहभाग घेत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडले. कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांच्या उत्साहाने चैतन्य निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले तर आभार प्रा. गायत्री काळे यांनी व्यक्त केले.