आपला जिल्हा

स्वच्छता का उपहार अंतर्गत कचरा विलगीकरण जनजागृती कार्यक्रमाची येवला बसस्थानक येथून सुरुवात.

मनिष जाधव 9823752964

Kopargaon Bagul Saraf
                                       जाहिरात

स्वच्छता का उपहार अंतर्गत कचरा विलगीकरण जनजागृती कार्यक्रमाची येवला बसस्थानक येथून सुरुवात.

येवला प्रतिनिधी – आज दि.१७ ऑक्टोबर २०२२ रोजी मे. केंद्र शासनाच्या ‘ स्वच्छता का उपहार ‘ कार्यक्रमांतर्गत शहरातील येवला बस स्थानक भागात स्वच्छता व कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शहरातील बस स्थानक येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नियुक्त केलेले स्वच्छता ब्रँड अँबेसिडर श्रीकांत खंदारे, सचिन सोनवणे, प्रसाद कुळकर्णी, पवन गादेकर, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, गोविंद गवंडे, प्रतीक उंबरे, तुषार लोणारी, संदीप बोढरे ,नितीन लोणारी आदींनी बस स्थानक, अमरधाम रोड व शनि पटांगण येथे जनजागृती केली.

स्वच्छता का उपहार
सदर कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबवण्यात येत आहे. ओला कचरा व सुखा कचरा एकत्रित न टाकता तो विलगीकृत करून ओला कचरा हिरव्या डस्टबिन मध्ये व सुका कचरा आणि निळ्या डस्टबिन मध्ये टाकणे अपेक्षित आहे.

स्वच्छता का उपहार
मे. शासनाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिनियम जारी केला असून त्या अंतर्गत सर्व सिंगल युज प्लास्टिक वर बंदी आणलेली आहे. तरी सदर उपक्रमांतर्गत शनिपटांगण येथील भाजी मंडई परिसरात प्लास्टिक बंदी ची कारवाई करण्यात आली. प्लास्टिकच्या वापरास पर्याय ठरू पाहणार्‍या कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आव्हान याद्वारे प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मूतकेकर यांनी केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!