आपला जिल्हापुणेमहाराष्ट्र

‘सूर्यदत्त’मध्ये सुरु करणार उदयोन्मुख ‘मेडिएशन’ क्षेत्रातील अभ्यासक्रम

संपादक मनिष जाधव 9823752964

‘सूर्यदत्त’मध्ये सुरु करणार उदयोन्मुख ‘मेडिएशन’ क्षेत्रातील अभ्यासक्रम
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची माहिती; मेडिएशन ट्रेनिंग सेंटर साठी ‘सूर्यदत्त’ व ‘रदांक्स’ यांच्यात सामंजस्य करार

पुणे प्रतिनिधी – “तंटा निवारणाच्या प्रक्रियेत मध्यस्थीची (मेडिएशन) भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे. जगभरात सध्या मेडिएशन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. सरकारने आणलेल्या ‘मध्यस्थी विधेयक २०२१’ या विधयेकामुळे भारतात देखील मेडिएशन क्षेत्रात नव्या संधी खुल्या होणार आहेत,” असे मत रदांक्स लिमिटेड, लंडनच्या मेडिएशन संचालक अदम्या राज यांनी व्यक्त केले.

सूर्यदत्त मेडिएशन ट्रेनिंग सेंटर पुणे
तंटा निवारणाच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरत असलेल्या उदयोन्मुख ‘मेडिएशन’ या विषयावर सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त लॉ कॉलेज आणि इंग्लंड येथील रदांक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात राज बोलत होत्या. ‘विवाद निराकरणात मध्यस्थी आणि त्याचे महत्त्व’ या विषयावर अदम्या राज यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या परिसंवादावेळी ‘सूर्यदत्त’मध्ये मेडिएशन ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व रदांक्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी प्रा. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, सूर्यदत्त लॉ कॉलजेच्या प्राचार्य प्रा. केतकी बापट आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त मेडिएटर, बहुआयामी मानवतावादी, युथ आयकॉन असलेल्या अदम्या राज लेखक, संपादक, भाषा शिक्षक, निवेदन व सामाजिक नेतृत्व म्हणून काम करत आहेत. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ‘मध्यस्थी विधेयक २०२१’ वाचनावेळी उपस्थित राहण्याची संधी अदम्या राज यांना मिळाली होती. मध्यस्थी विधेयकामुळे दोन्ही पक्षकारांच्या हिताची परिस्थिती निर्माण होते. शिवाय, पक्षकार नेहमी नियंत्रित राहतात, असे अदम्या राज यांनी नमूद केले.

सूर्यदत्त मेडिएशन ट्रेनिंग सेंटर

मेडिएशनची संकल्पना आणि त्याचे महत्व सांगताना राज यांनी मध्यस्थाची भूमिका, मध्यस्थीचे फायदे, प्रक्रिया आदींविषयी सविस्तर माहिती दिली. चांगल्या मध्यस्थीसाठीचे प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक पात्रता आणि कायदेशीर बाबी याविषयी उपस्थितांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. आंतरराष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आणि पर्यायी तंटा निवारण संस्था असलेल्या रदांक्स लिमिटेडच्या माध्यमातून जगभर सुरु असलेल्या मेडिएशन ट्रेनिंग याविषयी अदम्या राज यांनी सांगितले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी या माहितीपूर्ण परिसंवादाबद्दल राज यांचे आभार मानले. “मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून वैविध्यपूर्ण क्षेत्रातील नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रातील प्रशिक्षणाचा ‘सूर्यदत्त’ने समावेश केला आहे. सध्या जगभर तंटा निवारणात मध्यस्थी हा अतिशय महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे ‘सूर्यदत्त’ मध्येही लवकरच मध्यस्थी या विषयात उद्योगाभिमुख, व्यावहारिक आधारित मूल्यवर्धित अभ्यासक्रम सुरु करत आहोत. सेमिनारमध्ये सहभागी होणार्‍या सर्व प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि न्याय वितरण प्रणालीचा एक भाग व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!