आपला जिल्हामहाराष्ट्र

सीनाकाठच्या नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा नागवडे साखर कारखान्याकडून सत्कार…!

संपादक मनीष जाधव ९८२३७५२९६४

सीनाकाठच्या नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा नागवडे साखर कारखान्याकडून सत्कार…!
श्रीगोंदे प्रतिनिधी दादा सोनवणे  – नुकत्याच तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या,त्यामध्ये सीनाकाठ परिसरातील घोगरगाव, तरडगव्हाण, थिटेसांगवी, चवरसांगवी, बनपिंप्री ग्रामपंचायतीचा समावेश आहे.त्यातील घोगरगाव,थिटेसांगवी व चवरसांगवी गावातील नूतन ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चेअरमन राजेंद्र नागवडे व व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या हस्ते करण्यात आला.
सीनाकाठच्या नवनिर्वाचित सरपंच
सीनाकाठच्या नवनिर्वाचित सरपंच
यावेळी राजेंद्र नागवडे म्हणाले की,नागवडे घराण्याने कायमच जनतेशी नाळ जपली आहे.सीनाकाठ भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाला नागवडे साखर कारखाना सभासदांप्रमाणेच भाव देणार आहे त्यात कसलाही दुजाभाव केला जाणार नाही.विजयी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी गट-तट न पहाता गावात सर्वसमावेशक काम करावे.
बाबासाहेब भोस म्हणाले की गावाच्या विकासकामात लोकसहभाग घेतल्यास ती कामे चांगल्या पध्दतीने मार्गी लागतात,या भागातील जनतेच्या पाठीशी नागवडे साखर कारखाना खंबीरपणे उभा राहील अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी कारखाना संचालक सुभाष शिंदे, डाॅ.दिलीप भोस, थिटेसांगवीचे नवनिर्वाचित सरपंच अर्जुन शेळके, घोगरगावच्या सरपंच सुजाता मिलिंद भोसले, चवरसांगवीच्या सरपंच सुनीता शरद माळशिकारे, किसनराव उगले, बाबासाहेब गावडे, बक्षुदीन शेख, पै.अरुण मोरे, अंबादास उगले, राजेंद्र तरटे, शरद तरटे, आप्पासाहेब उल्हारे, दिक्षा संदिप पाचर्णे, उषा विकास तरटे, शेख मंडब्बी कलिदर, स्वाती अरुण मोरे, महादेव भोसले, मनोहर बचाटे, विलास वाल्हेकर, संतोष बोरुडे, रसुल शेख, धनंजय दाते, संदिप पाचर्णे, बबनराव गुंजाळ, बलभीम गोलवाड, पुष्पाबाई घनश्याम कसाब, साखरबाई बबन पवार,अर्जुनअप्पा वाळके, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अदिल शेख आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.कानिफनाथ उगले यांनी केले तर आभार प्रकाश बोरुडे यांनी मानले.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!